Sunday, February 21, 2016

रॅम काय असतो व कॉम्पुटर मध्ये त्याची भूमिका काय ?


मागील एखाद्या  पोस्ट मध्ये आपण मदरबोर्ड ची महिती घेतली होती,आज त्यालाच अनुसरून हि पोस्ट देत आहे. 
अनेकदा आपल्या कानावर रॅम हा शब्द पडलेला नक्कीच असेल मग तो कॉम्पुटर असो अथवा मोबाईल पण हा रॅम म्हणजे नक्की काय आहे तरी काय आणि त्याचा आपल्या कॉम्पुटर आणि मोबाईल मध्ये काय उपयोग ?
 रॅम म्हणजे (रॅन्डोम एक्सेस  मेमरी ) आता हे म्हणजे आणखी काय असा प्रश्न पडलाच असेल,
आपण कॉम्पुटर  अथवा मोबाईल असो त्यामध्ये मेमरी चा वापर करतो हे देखील सर्वांनाच माहित आहे जसे कि कॉम्पुटर मध्ये आपण हार्ड डिस्क चा वापर मेमरी म्हणून करतो किंवा मोबाईल मध्ये आपण मेमरी कार्ड चा वापर मेमरी म्हणून करतो बरोबर ना ?
तर रॅम म्हणजे देखील एक प्रकारची मेमरीच असते,परंतु तिचा वापर थोड्या वेगळ्या पद्धतीने होतो. थोडे आणखी खोलात जाऊन बघुयात 
ज्या प्रमाणे तुम्ही तुमचा डेटा कॉम्पुटरच्या मेमरी म्हणजेच हार्ड डिस्क मध्ये सेव्ह करता तसेच मोबाईल च्या मेमरी कार्ड मध्ये सेव्ह करता आणि तोच डेटा जेव्हा तुम्ही कॉम्पुटर किंवा मोबाईल कितीही वेळा  बंद करून चालू केला तरीही आहे तसाच राहतो आणि तुम्ही त्याचा वापर हवे तेवढ्या वेळा करू शकता उ.दा- कॉम्पुटर मध्ये असलेली   गाणी, मुव्हीज , गेम्स 
     पण रॅमच्या बाबतीत तसे नाही आहे,रॅम हि मेमरी जरी असली तरी तिचा वापर जोपर्यंत कॉम्पुटर अथवा मोबाईल चालू आहे तोपर्यंतच होतो एकदा का बंद करून चालू केले कि ती डेटा पुन्हा दिसत नाही 
उ.दा- तुम्ही काही सोफ्टवेअर  वापरत आहात किंवा गेम खेळत आहात त्याचवेळी तुम्ही काही आणखी काम करायचे म्हटले कि सर्व काही चालू ठेवून तुम्ही तिसरे काम करू शकता कारण हि सगळी कामे डेटा च्या स्वरुपात तात्पुरती रॅम मध्ये साठवली जातात पण समजा तुम्ही अचानक कॉम्पुटर बंद केला किंवा वीज कनेक्शन बंद झाले आणि जेव्हा तुम्ही पुन्हा कॉम्पुटर चालू कराल तर तुम्ही चालू ठेवलेले काम, गेम्स , सोफ्टवेअर  तुम्हाला तसेच चालू राहिलेले दिसणार नाही कारण रॅम म्हणजे तात्पुरत्या स्वरुपात असलेली मेमरी होय हि मेमरी जितकी जास्त तितके जास्त वेगवेगळी कामे एकाच वेळी लवकरात लवकर करता येतील म्हणून तुमचा कॉम्पुटर स्लो असल्यास तुम्हाला रॅम वाढवण्याचा सल्ला दिला जातो. 

आपल्या कॉम्पुटर मध्ये असलेल्या रॅमचे वर्गीकरण त्याच्या असलेल्या मदरबोर्ड वरून केले जातात तुमच्या माहिती साठी थोडक्यात सांगतो

पूर्वी पेंटीअम ३ कॉम्पुटर असायचे तेव्हा त्यात  एस.डी रॅम (SD RAM ) वापरले जायचे,
हे रॅम ३.३ व्होल्ट वर चालायचे 




त्यानंतर पेंटीअम ४ कॉम्पुटर आले तेव्हा त्यात डी.डी.आर १ रॅम (DDR 1) वापरले जाऊ लागले हे रॅम २.५ व्होल्ट वर चालतात 




मग तंत्रज्ञानाबरोबर पुढे  डी.डी.आर २ रॅम (DDR 2 ) आले,हे रॅम १. ८ व्होल्ट चालतात 





त्यानंतर आत्ता सध्या जास्त वापरात असलेले डी.डी.आर ३ रॅम  (DDR3 )आहेत जे कि १. ५ व्होल्ट वर चालतात 

यातील प्रत्येक प्रकार मागील रॅम पेक्षा अधिक वेगवान आहे परंतु कोणताही रॅम कोणत्याही मदरबोर्डला बसवता येत नाही.प्रत्येक मदरबोर्ड ला ज्या रॅमची योजना केलेली असते तोच रॅम त्यात लावला जातो 

No comments:

Post a Comment