या पोस्ट मध्ये आपण मदरबोर्डची प्राथमिक स्वरुपात माहिती घेणार आहोत आपल्या पैकी अनेकांकडे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप कॉम्पुटर असतीलच.
आपल्यापैकी अनेक जणांना मदरबोर्ड काय आहे व त्याचा उपयोग काय ते माहित नसेल तीच माहिती थोड्याफार प्रमाणात घेऊयात,
कॉम्पुटर मधील अनेक वस्तू आपल्याला माहित आहे तर काहींची फक्त नावे ऐकली आहे. एक कॉम्पुटर संच म्हणजे त्यात अनेक गोष्टी येतात,
उ.दा - माॅनिटर,कि बोर्ड , माउस , स्पीकर , पेन ड्राईव , प्रिंटर ,स्कॅनर इत्यादी
आता हे झाले आपल्याला माहित असलेले किंवा रोजच्या वापरात पाहिलेल्या वस्तू, रोजच्या वापरात न दिसणाऱ्या देखील अनेक वस्तू आहे ज्यांचा उपयोग आपण कॉम्पुटर चालवताना करतो पण त्या वस्तू आपल्याला वरचे वर दिसत नाही
उ.दा - प्रोसेसर ,रॅम , हार्ड डिस्क इत्यादी कारण त्या वस्तू आपल्या सी.पी.यु कॅबिनेट च्या आत असतात .
आता कॅबिनेट च्या बाहेर आणि आतमध्ये इतक्या सगळ्या वस्तू असतात या सगळ्या वस्तू एकमेकांशी कशा प्रकारे जोडल्या जातात किंवा एकमेकांबरोबर संपर्क कसा प्रस्थापित करतात आणि आपल्याला आऊटपुट कसे देतात ?
याचे उत्तर आहे मदरबोर्ड ज्याप्रमाणे आईशिवाय मनुष्याचे अस्थित्व असू शकत नाही त्याचप्रमाणे मदरबोर्ड शिवाय कॉम्पुटर चे अस्थित्व असू शकत नाही म्हणून त्याला मदरबोर्ड असे संबोधले जाले
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मदरबोर्ड म्हणजे नक्की काय असतो ?
मदरबोर्ड हा एक पी.सी.बी असतो ( प्रिंटेड सर्किट बोर्ड ) यावर अनेक प्रकारचे सर्किट्स प्रिंटेड स्वरुपात असतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आय.सी (इंटिग्रेटेड सर्किट ) लहान मोठे कपॅसिटर , काॅईल व इतर तस्तम इलेक्ट्रोनिक्स काॅम्पोनंट्स असतात.
त्याच बरोबर त्यावर अनेक प्रकारचे स्लॉट आणि पोर्ट असतात
उ. दा - रॅम स्लॉट यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा तेवढा रॅम लावू शकता
सी पी यु साॅकेट- यामध्ये तुम्हाला हवा तो प्रोसेसर लावता येऊ शकतो
तसेच आय डी ई आणि साटा स्लॉट- ज्याचा वापर तुम्ही हार्ड डिस्क लावण्यासाठी करू शकता .
त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरून जे कीबोर्ड, माॅनिटर ,माउस ,प्रिंटर इ . वस्तू कॉम्पुटर ला जोडता ते पोर्ट देखील मदरबोर्ड वरच असतात.
एकंदर याचा सारांश काय कि सगळ्या डायरेक्ट अथवा इंडायरेक्ट हार्डवेअर यांना एकत्र जोडण्याचे काम मदरबोर्ड करते आणि म्हणूनच कॉम्पुटर ला दिलेली माहितीचे आदान प्रदान होऊ शकते.
हि झाली मदरबोर्ड ची माहिती नंतरच्या पोस्ट मध्ये मदर बोर्ड शी जोडल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंवर माहिती घेऊ
No comments:
Post a Comment