नेहमी आपण आपला पेन ड्राईव्ह ,मेमोरी कार्ड या वस्तू USB द्वारे कॉम्पुटर ला जोडत असतो कधी आपल्या नाहीतर कधी दुसर्या कॉम्पुटर ला आपण जोडतो आणि बर्याच वेळा दुसर्याच्या कॉम्पुटर मध्ये व्हायरस असल्याने तो आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये येतो आणि मग असा पेन ड्राईव्ह फ़ाॅरमॅट होतो नाही,
फ़ाॅरमॅट करण्यासाठी सर्वांना माहिती असलेली पद्धत वापरतो ती अशी आपण माय कॉम्पुटर मध्ये जातो हव्या त्या ड्राईव्ह वर राईट क्लिक करून फ़ाॅरमॅट हा पर्याय निवडतो आणि फ़ाॅरमॅट करतो
परंतु कधी कधी आपल्या संगणकात असलेल्या व्हायरस मुळे पेन ड्राईव फॉरमेट होत नाही आणि मग अश्यावेळी काय करावे ते सुचत नाही आणि आपले काम अर्धवट राहते.
त्यासाठी एक सोपा असा उपाय सांगतो ज्याचा आपल्या सर्वांना उपयोग नक्कीच होऊ शकेल चला तर मग काय करायचे ते पाहूयात
सर्वप्रथम आपल्याला कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचे आहे त्यासाठी तुम्हाला Start -Accessories -Command promt अशा पद्धतीने तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट सापडेल ते तुम्ही ओपेन करा
आता कमांड प्रॉम्प्ट म्हणजे काही नाही फक्त एक काळी विंडो दिसेल, त्यामध्ये काही न करता फक्त format असे टाईप करायचे आहे आणि नंतर फक्त एक स्पेस देऊन आपल्याला कोणता ड्राईव्ह फ़ाॅरमॅट करायचा आहे तो टाईप करावा उ.दा - C: D: E: F: आणि फक्त एक इंटर प्रेस करायचा आहे
झाला एवढ झाला कि तुम्हाला and press ENTER when ready... असा मेसेज दिसेल त्यावेळी परत तुम्हाला एकदा इंटर बटन दाबायचे आहे मग तुमचा पेन ड्राईव्ह फ़ाॅरमॅट होण्यास सुरुवात होईल १००% झाला कि कमांड प्रॉम्प्ट बंद करा आणि माय कॉम्पुटर मध्ये जाऊन बघा तुमचा पेन ड्राईव्ह फ़ाॅरमॅट झालेला असेल
अनेकदा करप्ट झालेले पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड अशा प्रकारे फ़ाॅरमॅट केल्यास पुन्हा निट होतात
टिप्स -
फ़ाॅरमॅट या शब्दामध्ये आणि ड्राईव्ह च्या नावा मध्ये एक स्पेस असणे गरजेचे आहे
फ़ाॅरमॅट करताना ज्या ड्राईव्ह ला फ़ाॅरमॅट करायचे आहे त्याचे आद्यअक्षर गरजेचे आहे ड्राईव्ह ला तुम्ही दिलेले नाव नको
उ.दा C: D: E: F: हि आद्यअक्षरे हवी आहेत
आद्याअक्षर नंतर : असे दोन बिंदू गरजेचे आहेत
ज्या ड्राईव्ह मध्ये Operating system असेल असा ड्राईव्ह फ़ाॅरमॅट होणार नाही