Saturday, November 5, 2016

YuTube चॅनल चालू केला आहे नक्की या चॅनल ला भेट द्या, काही पैसे देखील कमवा

वाचकांच्या आवडी लक्षात घेता लिखाणाला प्रत्यक्षाची जोड देण्यासाठी अशाच पद्धतीचा युट्युब चॅनल चालू केला आहे, येथे देखील तुम्हाला याच पद्धतीच्या टिप्स आणि ट्रिक्स प्रत्यक्ष करून दाखवल्या आहेत तसेच आपण सगळे देखील युट्युब वर आपल्या असलेल्या कुठल्याही ज्ञाना च्या आधारे माहिती च्या आधारे पैसे कसे कमवू शकता यासंदर्भात देखील मार्गदर्शन केले आहे तुम्ही नक्की या चॅनल ला भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल जमल्यास सांगितल्या प्रमाणे स्वतःचा देखील एक चॅनल चालू करा वर काही पैसे देखील कमवा ते कसे आणि कधी हे तुम्हाला चॅनल वर आल्यावरच कळेल चॅनलची लिंक येथे देत आहे एकदा जरूर भेट द्या



Sunday, April 3, 2016

कोणत्याही सोफ्टवेअर शिवाय मोबाईल चे स्पीड वाढवा

नमस्कार मित्रांनो मी आशिष स्वागत करतो तुमचे आपल्या या मराठी ब्लॉग वर या ब्लॉग वर मी तुमच्यासाठी नेहमीच कॉम्पुटर आणि मोबाईल तंत्रज्ञानावर असलेल्या खास अशा टिप्स आणि ट्रिक्स घेऊन येत असतो तसेच आजही मी तुमच्यासाठी खास ट्रिक घेऊन आलो आहे जी आपल्या आवडत्या मोबाईल शी संबंधित आहे. 
   आज काल आपण खूप हौसेने मोबाईल घेत असतो आणि वापरत असतो पण तुम्हाला एक गोष्ट मोबाईल वापरत असताना नक्कीच जाणवली असेल कि जेव्हा तुम्ही मोबाईल खरेदी करता तेव्हा तो खूप छान चाललेला असतो आणि जस जसा आपण तो वापरत जाऊ तसा तो स्लो होत जातो मग शेवटी आपण वैतागून त्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स टाकतो कि पुन्हा त्याचा स्पीड वाढावा म्हणून अनेकदा आपल्याला त्याचा फायदा होतो आणि कधी कधी तर त्याच अप्लिकेशन चा डोक्याला ताप होऊन बसतो पण मी आज तुम्हाला देखील मोबाईल चे स्पीड वाढवण्याच्या संबंधित ट्रिक सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे एप्लिकेशन डाउनलोड करायचे नाही आहे आपल्या मोबाईल मधेच काही सेटिंग अशा आहेत कि त्याने आपला मोबाईल बर्यापैकी वेगाने चालतो चला तर मग पाहूयात आपल्याला काय करावे लागेल 



१) सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मोबाईल च्या सेटिंग मध्ये जावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे  Developer options हा पर्याय ओपन करायचा आहे. 

टीप:  जर तुमच्या मोबाईल मध्ये  Devloper options दिसत नसेल तर त्याला व्हिसीबल करण्यासाठी काय     करायचे हे मी शेवटी  सांगणार आहे 

२) Developer options दिसल्यानंतर तुम्हाला त्यावर टच करून ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला Window animation scale आणि Transition animation scale आणि Animator duration scale हे  तीन पर्याय शोधायचे आहे 


  आता फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे तीनही पर्याय तुम्हाला समोर दिसतील आणि त्याची प्रत्येकाची सेटिंग Animation scale .5  अशा प्रकारे असेल आता तुम्हाला प्रत्येक पर्याया वर एक टच करायचा आहे म्हणजेच तो पर्याय ओपन करायचा आहे आणि Animation off  हा ऑप्शन निवडायचा आहे तीनही पर्याया साठी एकच सेटिंग करायची आहे.
 


झाला आता एवढे केले कि तुमचा मोबाईल एकदा बंद करून पुन्हा चालू करा आणि बघा बर काही फरक पडला का तुम्हाला देखील खूप फरक जाणवेल तुमचा मोबाईल नेहमीपेक्षा जास्त स्पीड ने चालेल बघा करून बघा आवडले तर नक्की सांगा.



आता जर Developer options तुमच्या मोबिल मध्ये दिसत नसेल तर तो कसा आणायचा ते आपण पाहूयात 
यासाठी तुम्हाला मोबाईल च्या सेटिंग मध्ये जायचे आहे आणि सेटिंग मध्ये शक्यतो सगळ्यात शेवटी असलेला About device किंवा  About phone ओपन करायचा आहे.

 यामध्ये तुम्हाला जास्त नाही चार ते पाच पर्याय असतील त्यामधील
 Custome build version या पर्यायावर पाच वेळा पटापट टच करायचे आहे झाला एवढे केले कि तुमच्या सेटिंग मध्ये Developer options लगेच दिसू लागेल 


तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली नक्की सांगा कारण अशाच प्रकारच्या पोस्ट मी येथून पुढे देखील तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.
आणखी एक आनंदाची गोष्ट सांगायची अशी कि युटूब वर देखील चेनेल चालू केलेला आहे तेथे देखील अशाच प्रकारचे टिप्स आणि ट्रिक्स व्हिडीओ स्वरुपात आहे जमल्यास ते देखील पहा आणि सबस्क्राईब करा 






Saturday, April 2, 2016

आता एकाच मोबाईल मध्ये दोन व्हॉट्स एप वापरा

नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी खूप उपयोगाची पोस्ट घेऊन  आलो आहे, आज  प्रत्येक जन मोबाईल वापरतो आहेच  त्याहीपेक्षा जास्त आपण व्हॉट्स एप वापरतो आहे. पण आपल्याला एका मोबाईल मध्ये एकाच नंबर चे  व्हॉट्स एप  वापरता येते. अनेकदा आपल्याकडे दोन वेगवेगळे नंबर असतात आणि आपल्याला दोन्ही नंबर साठी व्हॉट्स एप वापरायचे असते पण एका वेळी एकच व्हॉट्स एप आपल्या मोबाईल मध्ये चालू शकते आजच्या पोस्ट मध्ये  तुम्हाला एकाच मोबाइल मध्ये दोन व्हॉट्स एप कसे वापरायचे ते सांगणार आहे आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला दोन सिमकार्ड असलेला मोबाईल असण्याची देखील गरज नाही एक सिमकार्ड असलेल्या मोबाईल मध्ये देखील तुम्ही दोन व्हॉट्स एप  वापरू शकता चला तर  मग सुरु करूयात 
          यासाठी तुम्हाला एक लहानसे सोफ्टवेअर डाउनलोड  करावे लागेल त्यासाठी  तुम्हाला  मी शेवटी एक लिंक देणार आहे ते तुम्ही डाउनलोड करून इंस्टाल करून घ्या  तसेच त्या सोफ्टवेअर चे नाव आहे GB WhatsApp 


              सोफ्टवेअर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल  
 तुम्ही हे डायरेक्ट प्ले स्टोअर मधून देखील डाउनलोड करू शकता हे व्हॉट्स एप इंस्टाल केल्यानंतर ते सेम टू सेम आपल्या व्हॉट्स एप सारखेच दिसेल त्यानंतर सगळी प्रोसेस व्हॉट्स एप सारखीच आहे ओपन केल्यानंतर इथे फक्त Agree and continue वर एक क्लिक करा आणि त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय करावा लागेल एवढे केले कि झाले तुमचे दुसरे व्हॉट्स एप चालू ते देखील एकाच मोबिल वर
  यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट अशी कि जर तुमचा मोबाईल दोन सिमकार्ड असलेला असेल तर व्हेरीफाय करताना व्हॉट्स एप कडून आलेला मेसेज तुमच्याच मोबिल मध्ये येईल 
पण जर तुमचा मोबाईल एकाच सिमकार्ड चा असेल तर तुम्ही जो मोबाईल नंबर व्हॉट्स एप साठी वापरणार आहात तो नंबर ज्या मोबाईल मध्ये  आहे त्या मोबाईल मध्ये येईल आणि मग तो आलेला मेसेज म्हणजे व्हेरिफिकेशन कोड नंबर तुम्हाला स्वतः तुमच्या मोबिल मध्ये टाईप करावा लागेल  मग त्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याच सिमकार्ड ची आवश्यक्यता नाही पण यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवावी व्हेरिफिकेशन कोड दुसऱ्या मोबाईल वर आला असताना तो मेन्युअल टाईप करण्यासाठी ५ मिनिटे वाट पहावी लागते 
आणि जर तुम्हाला हवा असलेला नंबर त्याच मोबिल मध्ये असेल ज्यामध्ये तुम्हाला दुसरे व्हॉट्स एप सुरु करायचे आहे त्यासाठी वाट पहावी लागणार नाही पण यासाठी दोन सिमकार्ड असलेला मोबाईल गरजेचा आहे 
अशा  दोन्ही प्रकाराने तुम्ही एकाच मोबाईल मध्ये दोन व्हॉट्स एप  वापरू शकता

आशा करतो हि पोस्ट तुम्हाला उपयोगी पडेल आणि आवडेल देखील येथून पुढे देखील तुमच्यासाठी अशाच प्रकारच्या ट्रिक्स आणि टिप्स घेऊन येणारच आहे तोपर्यंत धन्यवाद  

Saturday, February 27, 2016

कमांड प्रॉम्प्ट वापरून पेन ड्राईव्ह फ़ाॅरमॅट कसा कराल ?




नेहमी आपण आपला पेन ड्राईव्ह ,मेमोरी कार्ड  या वस्तू USB द्वारे कॉम्पुटर ला जोडत असतो कधी आपल्या नाहीतर कधी दुसर्या कॉम्पुटर ला आपण जोडतो आणि बर्याच वेळा दुसर्याच्या कॉम्पुटर मध्ये व्हायरस असल्याने तो आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये येतो आणि मग असा पेन ड्राईव्ह फ़ाॅरमॅट होतो नाही, 
फ़ाॅरमॅट करण्यासाठी सर्वांना माहिती असलेली पद्धत वापरतो ती अशी आपण माय कॉम्पुटर मध्ये जातो हव्या त्या ड्राईव्ह वर राईट क्लिक करून फ़ाॅरमॅट हा पर्याय निवडतो आणि फ़ाॅरमॅट करतो 

परंतु कधी कधी आपल्या संगणकात असलेल्या व्हायरस मुळे पेन ड्राईव फॉरमेट होत नाही आणि मग अश्यावेळी काय करावे ते सुचत नाही आणि आपले काम अर्धवट राहते. 
त्यासाठी एक सोपा असा उपाय सांगतो ज्याचा आपल्या सर्वांना उपयोग नक्कीच होऊ शकेल चला तर मग काय करायचे ते पाहूयात 



सर्वप्रथम आपल्याला कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचे आहे त्यासाठी तुम्हाला Start -Accessories -Command promt  अशा पद्धतीने तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट सापडेल ते तुम्ही ओपेन करा 

आता कमांड प्रॉम्प्ट म्हणजे काही नाही फक्त एक काळी विंडो दिसेल, त्यामध्ये काही न करता फक्त format असे टाईप करायचे आहे आणि  नंतर फक्त एक स्पेस देऊन आपल्याला कोणता ड्राईव्ह फ़ाॅरमॅट करायचा आहे तो टाईप करावा उ.दा - C: D: E: F: आणि फक्त एक इंटर प्रेस करायचा आहे 


झाला एवढ झाला कि तुम्हाला and press ENTER when ready... असा मेसेज दिसेल त्यावेळी परत तुम्हाला एकदा इंटर  बटन दाबायचे आहे मग तुमचा पेन ड्राईव्ह फ़ाॅरमॅट होण्यास सुरुवात होईल १००% झाला कि कमांड प्रॉम्प्ट बंद करा आणि माय कॉम्पुटर मध्ये जाऊन बघा तुमचा पेन ड्राईव्ह फ़ाॅरमॅट झालेला असेल 

अनेकदा करप्ट झालेले पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड अशा प्रकारे फ़ाॅरमॅट केल्यास पुन्हा निट होतात 

टिप्स -

फ़ाॅरमॅट या शब्दामध्ये आणि ड्राईव्ह च्या नावा मध्ये एक स्पेस असणे गरजेचे आहे 

फ़ाॅरमॅट करताना ज्या ड्राईव्ह ला फ़ाॅरमॅट करायचे आहे त्याचे  आद्यअक्षर गरजेचे आहे ड्राईव्ह ला तुम्ही दिलेले नाव नको 
उ.दा C: D: E: F: हि आद्यअक्षरे हवी आहेत 

आद्याअक्षर नंतर : असे दोन बिंदू गरजेचे आहेत 

ज्या ड्राईव्ह मध्ये Operating system  असेल असा ड्राईव्ह फ़ाॅरमॅट होणार नाही 

Tuesday, February 23, 2016

कोणत्याही सोफ्टवेअर शिवाय पेन ड्राईव्ह ला पासवर्ड प्रोटेक्ट करा

मित्रांनो आज प्रत्येकाच्या खिशामध्ये एखादा पेन ड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड असतेच बर्याचदा आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये अतिशय महत्वाचा डेटा  असतो किंवा आपला खाजगी डेटा असतो अनेकदा आपला पेन ड्राईव्ह आपल्याशिवाय दुसरा कोणी देखील वापरत असतो नाही तर कधी आपला पेन ड्राईव्ह हरवला आणि तो कोणाला सापडला तर आपल्या डेटा  चा गैरवापर होऊ शकतो आणि असे होण्यापासून कसे रोखावे तेच आज सांगणार आहे म्हणूनच हि पोस्त आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची अशी आहे.


 आज आपण आपल्या पेन ड्राईव्ह ला पासवर्ड प्रोटेक्ट कसे करायचे ते पाहणार आहोत, तसे पाहायला गेल तर इंटरनेट वर पेन ड्राईव्ह ला पासवर्ड प्रोटेक्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे सोफ्टवेअर मिळतात परंतु ते डाउनलोड करण्यापसून ते पेन ड्राईव्ह पासवर्ड प्रोटेक्ट करण्यापर्यंत अनेक क्लिष्ट प्रक्रिया असू शकतात म्हणूनच आज आपण कोणतेही सोफ्टवेअर न वापरता आपला पेन ड्राईव्ह पासवर्ड प्रोटेक्टेड करणार आहोत.
 चला तर मग सुरुवात करू सुरवातीला तुम्ही तुमचा पेन ड्राईव्ह तुमच्या कॉम्पुटर ला जोड आणि माय कॉम्पुटर मध्ये जा





आता तुमचा पेन ड्राईव्ह जेथे दिसत आहे त्याच्यावर राईट क्लिक करा तेव्हा तुम्हाला काही ओप्श्न्स दिसतील त्यामधील Turn on BitLocker... हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा, आता तुम्हाला खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारला जाइल या ठिकाणी तुम्हाला जो हवा तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाईप करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा 

आता तुम्ही नेक्स्ट वर क्लिक केल्यावर तुम्हाला समोर पुन्हा दोन पर्याय दिसतील त्यातला पहिला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे  याचा उपयोग असा कि समजा तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला आहे तेव्हा तुमच्या कॉम्पुटर मधेच त्यासाठी पर्यायी पासवर्ड म्हणून एक फाईल सेव्ह होईल जेव्हा कधी तुम्ही तुमचा पासवर्ड विसराल तेव्हा तुम्हाला या फाईल चा उपयोग तुमचा पेन ड्राई व्ह ओपन करण्यासाठी होईल
 दुसरा पर्याय म्हणजे तीच फाईल तुम्हाला प्रिंट काढून हवी असल्यास तुम्ही त्याची प्रिंट काढून ठेऊ शकता यातील आपण पहिला पर्याय म्हणजे कॉम्पुटर मधेच रिकव्हरी फाईल सेव्ह करण्यास घेऊ हा पर्याय निवडून जेव्हा तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तुमची फाईल कोठे सेव्ह करायची आहे हे विचारले जाईल

 तुम्ही हव्या त्या जागी फाईल सेव्ह करा जसे तुम्ही पुढे जाल तसे तुम्हाला 

Are you ready to encrypt this drive ? असे विचारले जाइल म्हणजे तुम्ही कन्फर्म आहात का हे तुम्हाला विचारले जाइल  मग तुम्हाला  Start Encrypting  या बटनावर क्लिक करायचे आहे या नंतर तुम्हाला काही न करता फक्त वाट पहायची आहे कारण या प्रक्रीये साठी साधारण १० ते १५ मिनिटाचा कालावधी लागू शकतो काळजी न करता तुम्ही थोडा वेळ थांबलात तर तुमची प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला तसा मेसेज समोर दिसेल मग काय झाले काम तुमचा पेन ड्राईव्ह एकदा काढून पुन्हा जोडून पहा तुम्हाला पासवर्ड विचारला जाइल जोपर्यंत तुम्ही पासवर्ड टाईप करणार नाही तो पर्यंत तुमचा असलेला डेटा पाहू शकणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुमची Encrypting ची प्रक्रिया चालू आहे तो पर्यंत तुम्ही तुमचा पेन ड्राईव्ह डिस्कनेक्ट करू नका अन्यथा तुमचा असलेला डेटा करप्ट होण्याचा धोका आहे  

Sunday, February 21, 2016

रॅम काय असतो व कॉम्पुटर मध्ये त्याची भूमिका काय ?


मागील एखाद्या  पोस्ट मध्ये आपण मदरबोर्ड ची महिती घेतली होती,आज त्यालाच अनुसरून हि पोस्ट देत आहे. 
अनेकदा आपल्या कानावर रॅम हा शब्द पडलेला नक्कीच असेल मग तो कॉम्पुटर असो अथवा मोबाईल पण हा रॅम म्हणजे नक्की काय आहे तरी काय आणि त्याचा आपल्या कॉम्पुटर आणि मोबाईल मध्ये काय उपयोग ?
 रॅम म्हणजे (रॅन्डोम एक्सेस  मेमरी ) आता हे म्हणजे आणखी काय असा प्रश्न पडलाच असेल,
आपण कॉम्पुटर  अथवा मोबाईल असो त्यामध्ये मेमरी चा वापर करतो हे देखील सर्वांनाच माहित आहे जसे कि कॉम्पुटर मध्ये आपण हार्ड डिस्क चा वापर मेमरी म्हणून करतो किंवा मोबाईल मध्ये आपण मेमरी कार्ड चा वापर मेमरी म्हणून करतो बरोबर ना ?
तर रॅम म्हणजे देखील एक प्रकारची मेमरीच असते,परंतु तिचा वापर थोड्या वेगळ्या पद्धतीने होतो. थोडे आणखी खोलात जाऊन बघुयात 
ज्या प्रमाणे तुम्ही तुमचा डेटा कॉम्पुटरच्या मेमरी म्हणजेच हार्ड डिस्क मध्ये सेव्ह करता तसेच मोबाईल च्या मेमरी कार्ड मध्ये सेव्ह करता आणि तोच डेटा जेव्हा तुम्ही कॉम्पुटर किंवा मोबाईल कितीही वेळा  बंद करून चालू केला तरीही आहे तसाच राहतो आणि तुम्ही त्याचा वापर हवे तेवढ्या वेळा करू शकता उ.दा- कॉम्पुटर मध्ये असलेली   गाणी, मुव्हीज , गेम्स 
     पण रॅमच्या बाबतीत तसे नाही आहे,रॅम हि मेमरी जरी असली तरी तिचा वापर जोपर्यंत कॉम्पुटर अथवा मोबाईल चालू आहे तोपर्यंतच होतो एकदा का बंद करून चालू केले कि ती डेटा पुन्हा दिसत नाही 
उ.दा- तुम्ही काही सोफ्टवेअर  वापरत आहात किंवा गेम खेळत आहात त्याचवेळी तुम्ही काही आणखी काम करायचे म्हटले कि सर्व काही चालू ठेवून तुम्ही तिसरे काम करू शकता कारण हि सगळी कामे डेटा च्या स्वरुपात तात्पुरती रॅम मध्ये साठवली जातात पण समजा तुम्ही अचानक कॉम्पुटर बंद केला किंवा वीज कनेक्शन बंद झाले आणि जेव्हा तुम्ही पुन्हा कॉम्पुटर चालू कराल तर तुम्ही चालू ठेवलेले काम, गेम्स , सोफ्टवेअर  तुम्हाला तसेच चालू राहिलेले दिसणार नाही कारण रॅम म्हणजे तात्पुरत्या स्वरुपात असलेली मेमरी होय हि मेमरी जितकी जास्त तितके जास्त वेगवेगळी कामे एकाच वेळी लवकरात लवकर करता येतील म्हणून तुमचा कॉम्पुटर स्लो असल्यास तुम्हाला रॅम वाढवण्याचा सल्ला दिला जातो. 

आपल्या कॉम्पुटर मध्ये असलेल्या रॅमचे वर्गीकरण त्याच्या असलेल्या मदरबोर्ड वरून केले जातात तुमच्या माहिती साठी थोडक्यात सांगतो

पूर्वी पेंटीअम ३ कॉम्पुटर असायचे तेव्हा त्यात  एस.डी रॅम (SD RAM ) वापरले जायचे,
हे रॅम ३.३ व्होल्ट वर चालायचे 




त्यानंतर पेंटीअम ४ कॉम्पुटर आले तेव्हा त्यात डी.डी.आर १ रॅम (DDR 1) वापरले जाऊ लागले हे रॅम २.५ व्होल्ट वर चालतात 




मग तंत्रज्ञानाबरोबर पुढे  डी.डी.आर २ रॅम (DDR 2 ) आले,हे रॅम १. ८ व्होल्ट चालतात 





त्यानंतर आत्ता सध्या जास्त वापरात असलेले डी.डी.आर ३ रॅम  (DDR3 )आहेत जे कि १. ५ व्होल्ट वर चालतात 

यातील प्रत्येक प्रकार मागील रॅम पेक्षा अधिक वेगवान आहे परंतु कोणताही रॅम कोणत्याही मदरबोर्डला बसवता येत नाही.प्रत्येक मदरबोर्ड ला ज्या रॅमची योजना केलेली असते तोच रॅम त्यात लावला जातो 

Saturday, February 20, 2016

मदरबोर्ड काय ? व कसा ?





या पोस्ट मध्ये आपण मदरबोर्डची प्राथमिक स्वरुपात माहिती घेणार आहोत आपल्या पैकी अनेकांकडे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप कॉम्पुटर असतीलच. 
आपल्यापैकी अनेक जणांना मदरबोर्ड काय आहे व त्याचा उपयोग काय ते माहित नसेल तीच माहिती थोड्याफार प्रमाणात घेऊयात, 
  कॉम्पुटर मधील अनेक वस्तू आपल्याला माहित आहे तर काहींची फक्त नावे ऐकली आहे. एक कॉम्पुटर संच म्हणजे त्यात अनेक गोष्टी येतात,
उ.दा - माॅनिटर,कि बोर्ड , माउस , स्पीकर , पेन ड्राईव , प्रिंटर ,स्कॅनर इत्यादी 
आता हे झाले आपल्याला माहित असलेले किंवा रोजच्या वापरात पाहिलेल्या वस्तू, रोजच्या वापरात न दिसणाऱ्या देखील अनेक वस्तू आहे ज्यांचा उपयोग आपण कॉम्पुटर चालवताना करतो पण त्या वस्तू आपल्याला वरचे वर दिसत नाही 
उ.दा - प्रोसेसर ,रॅम , हार्ड डिस्क इत्यादी कारण त्या वस्तू आपल्या सी.पी.यु कॅबिनेट च्या आत असतात . 
आता कॅबिनेट च्या बाहेर आणि आतमध्ये इतक्या सगळ्या  वस्तू असतात या सगळ्या वस्तू एकमेकांशी कशा प्रकारे जोडल्या जातात किंवा एकमेकांबरोबर संपर्क कसा प्रस्थापित करतात आणि आपल्याला आऊटपुट कसे देतात ?
याचे उत्तर आहे मदरबोर्ड ज्याप्रमाणे आईशिवाय मनुष्याचे अस्थित्व असू शकत नाही त्याचप्रमाणे मदरबोर्ड शिवाय कॉम्पुटर चे अस्थित्व असू शकत नाही म्हणून त्याला मदरबोर्ड असे संबोधले जाले 
     आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मदरबोर्ड म्हणजे नक्की काय असतो ?
मदरबोर्ड हा एक पी.सी.बी असतो ( प्रिंटेड सर्किट बोर्ड ) यावर अनेक प्रकारचे सर्किट्स प्रिंटेड स्वरुपात असतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आय.सी (इंटिग्रेटेड सर्किट ) लहान मोठे कपॅसिटर , काॅईल व इतर तस्तम इलेक्ट्रोनिक्स काॅम्पोनंट्स   असतात. 
   त्याच बरोबर त्यावर अनेक प्रकारचे स्लॉट आणि पोर्ट असतात
उ. दा - रॅम स्लॉट यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा तेवढा रॅम लावू शकता 

सी पी यु साॅकेट- यामध्ये तुम्हाला हवा तो प्रोसेसर लावता येऊ शकतो 
तसेच आय डी ई आणि साटा स्लॉट- ज्याचा वापर तुम्ही हार्ड डिस्क लावण्यासाठी करू शकता . 
त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरून जे कीबोर्ड, माॅनिटर ,माउस ,प्रिंटर इ . वस्तू कॉम्पुटर ला जोडता ते पोर्ट देखील मदरबोर्ड वरच असतात. 
एकंदर याचा सारांश काय कि सगळ्या डायरेक्ट अथवा इंडायरेक्ट हार्डवेअर यांना एकत्र जोडण्याचे काम मदरबोर्ड करते आणि म्हणूनच कॉम्पुटर ला दिलेली माहितीचे आदान प्रदान होऊ शकते. 
   हि झाली मदरबोर्ड ची माहिती नंतरच्या पोस्ट मध्ये मदर बोर्ड शी जोडल्या जाणाऱ्या  वेगवेगळ्या वस्तूंवर माहिती घेऊ     

Wednesday, February 17, 2016

व्हायरस म्हणजे काय ? त्याचे उपाय

मीत्रांनो तुम्ही व्हायरस हा शब्द खूप वेळा ऐकला असेल आणि या व्हायरस चा तुम्हाला त्रास देखील झाला असेल.कधी असे झाले आहे का तुमचा संगणक अचानक खूप स्लोव झाला आहे कधी अचानक तुम्ही न उघडलेल्या फाईल ओपन होत आहे अचानक रिकामे फोल्डर दिसू लागतात ते delete होत नाही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी होतात, आता हा virus म्हणजे असते काय ? जसे आपण वेगवेगळे प्रोग्राम आपल्या गरजे नुसार आपण आपल्या सोयी साठी वापरत असतो, तसाच virus म्हणजे एक प्रकारचा लहान प्रोग्राम असतो फक्त तो आपल्या उपयोगाचा नसून आपल्या संगणकासाठी हानिकारक असतो virus देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतो virus , malware , trojen आपला संगणक slow करण्यापासून ते आपला संगणक hack करण्यापर्यंत हा virus काम करतो. आता हा virus आपल्या संगणकापासून दूर ठेवण्यासाठी सध्या अनेक प्रकारचे antivirus softwareमिळतात पण ते पैसे देऊन खरेदी करावे लागतात,अनेक वेळा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.
परंतु असे केल्याने आपल्या संगणकाची हानी होऊ शकते त्यासाठी आपण इंटरनेट वर मिळणारे अनेक मोफत antivirus वापरू शकता
आणि आपला संगणक सुरक्षित ठेऊ शकता इंटरनेट वर बरेचसे antivirus मिळतात परंतु त्यामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे काही antivirus software आहेत ते मी येथे तुम्हाला सांगतो
१) avast antivirus हा antivirus इंटरनेट वर मोफत मिळतो आणि वापरणे अगदी सोपे आहे या antivirusची खासियत अशी आहे कि virus सापडल्या नंतर voice alarm द्वारे आपल्याला सांगितले जाते

2) AVG antivirus हा antivirus देखील जास्त प्रमाणात वापरला जातो मोफत antivirus मध्ये हा देखील चांगला पर्याय आहे,

३) avira antivirus हा antivirus देखील बर्याच प्रमाणात वापरला जातो तुम्ही या antivirus softwareवापरून आपल्या संगणकाला virus पासून सुरक्षित ठेऊ शकता


Tuesday, February 16, 2016

संगणक वापरता आहात? मग हे लक्षात ठेवा



जर तुम्ही संगणक वापरता आहात तर तुम्हाला माहित आहे कि तुमच्या संगणकाला तुमची मदत करण्यासाठी काही गरजेचे software हवे असतात ?


मित्रांनो कधी असे झाले आहे का कि कोणती एक फाईल तुमच्या मित्राच्या संगणकावर open होते आणि ती तुमच्या संगणकावर होत नाही किंवा तुमच्या संगणकावर youtube video दिसत नाही ?

या समस्या अगदी लहान आहे जेव्हा आपण संगणक वापरतो तेव्हा सगळे programmes व्यवस्तीत चालण्यासाठी आपल्याला काही software टाकावे लागतात ते प्रत्येकाच्या गरजे नुसार वेगळे असू शकतात परंतु काही गोष्टी सर्वांसाठी आवश्यक आहे,
त्या अशा
आपल्यालाकडे Microsoft Office असणे आवश्यक आहे, आपल्या वापरत असलेल्या बरयाच files word , exel , power point अशा format मध्ये असतात त्यासाठी आपल्याकडे Microsoft Office हा प्रोग्राम असणे आवश्यक आहे



आपल्याकडे adobe flash player असणे आवश्यक आहे या शिवाय काही site वरील animation आपण पाहू शकत नाही तसेच you tube वरील video आपण पाहू शकणार नाही
याच बरोबर आपल्याकडे adobe reader असणे देखील गरजेचे आहे इंटरनेट वरून घेतलेल्या बरयाच files या PDF या format मध्ये असतात आणि adobe reader शिवाय आपण त्या पाहू शकत नाही



टीप :- Flash player आणि adobe reader यांची लिंक सोबतच दिली आहे तेथून तुम्ही हे दोन्ही software download करू शकता.

Sunday, February 14, 2016

माय कॉम्पुटर मधून हवा तो ड्राईव्ह हाईड करा

आजची हि पोस्ट खूप उपयोगाची आणि गरजेची आहे,आज काल सगळ्यांकडेच कॉम्पुटर आहेत अस मानायला हरकत नाही आणि आपल्या कॉम्पुटर मध्ये अनेक डेटा असा असतो कि तो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असतो काही आपल्या कामाशी संबंधित असतो काही आपल्या कॉलेज मधील असतो आणि अशातच जर तुमचा कॉम्पुटर घरातील इतर व्यक्ती वापरत असतील किंव्हा कोणी पाहुणे तुमच्याकडे आले आहेत आणि त्यांची लहान मुले तुमच्या कॉम्पुटर वर गेम्स खेळत असतील तर त्यांच्या हातून चुकून तुमचा डेटा डिलीट किंवा फॉरमॅट होण्याची शक्यता असते अश्यावेळी तुम्ही काय करू शकता हेच तुम्हाला या पोस्ट  मध्ये सांगणार आहे   

 कोणतही सोफ्टवेअर न वापरता  आपल्या कॉम्पुटर मधील आपल्याला हवा तो ड्राईव्ह हाईड कसा करायचा हे आता आपण पाहू 

सगळ्यात आधी तुम्हाला माय कॉम्पुटर वर राईट क्लिक करायचं आहे आणि आलेल्या ऑप्शन मधून मॅनेज हा पर्याय निवडायचा आहे म्हणजे त्यावर क्लिक करायचे आहे.


सगळ्यात आधी तुम्हाला माय कॉम्पुटर वर राईट क्लिक करायचं आहे आणि आलेल्या ऑप्शन मधून मॅनेज हा पर्याय निवडायचा आहे म्हणजे त्यावर क्लिक करायचे आहे  

आता समोर तुम्हाला कॉम्पुटर मॅनेजमेंट ची विंडोव आलेली दिसेल यामध्ये डाव्या बाजूला काही मेनू आलेले दिसतील त्यामधील डिस्क मॅनेजमेंट या मेनूवर क्लिक करा आता हे काहीसे चित्रात दाखवल्या प्रमाणे दिसेल   






आता उजव्या बाजूला व्हॉल्यूम या मेनू खाली तुम्हाला तुमच्या कॉम्पुटर मधील असलेले 
ड्राईव्ह सी, डी, ई, एफ एकाखाली एक असे दिसत असतील आता 
सी ड्राईव्ह सोडून तुम्हाला जो ड्राईव्ह  हाईड करायचा आहे त्याच्यावर एक राईट क्लिक करा आणि आलेल्या ऑप्शन मधून चेंज ड्राईव्ह लेटर  ऍन्ड पाथ या ऑप्शन वर क्लिक करा मग लगेच चेंज ड्राईव्ह लेटर  ऍन्ड पाथ ची एक लहानशी विंडो दिसेल यात एड, चेंज, रीम्हुव  असे तीन ऑप्शन असतील त्यातील रीम्हुव हा पर्याय निवडून ओके वर क्लिक करा 





जसे तुम्ही क्लिक कराल तसाच डिस्क मेनेजमेंट चा कन्फर्मेशन साठी एक मेसेज येईल त्यावर येस वर क्लिक करा एवढे केले कि झाले काम तुमच्या माय कॉम्पुटर मध्ये जाऊन बघा जो  ड्राईव्ह तुम्ही हाईड केला होता तो गायब झालेला असेल  
आता ड्राईव्ह हाईड तर झालेला आहे पण तो परत कसा मिळवायचा हा पण मोठा प्रश्न आहे पण काळजी करू नका अगदी सोप्प आहे आत्ता पर्यंत केलेली प्रक्रिया परत करायची चेंज ड्राईव्ह लेटर  ऍन्ड पाथ ची लहान विंडो आली कि रीम्हुव न करता अॅड वर क्लिक करायचं 
आता ड्राईव्ह हाईड तर झालेला आहे पण तो परत कसा मिळवायचा हा पण मोठा प्रश्न आहे पण काळजी करू नका अगदी सोप्प आहे आत्ता पर्यंत केलेली प्रक्रिया परत करायची चेंज ड्राईव्ह लेटर  ऍन्ड पाथ ची लहान विंडो आली कि रीम्हुव न करता अॅड वर क्लिक करायचं आणि लेटर अॅड ऍन्ड पाथ ची लहान विंडो आली
कि फक्त ओके करायचं झाला तुमचा गायब झालेला  ड्राईव्ह आता परत आलेला असेल आहे न छान करून बघा  















Friday, February 12, 2016

कोणाचाहि व्हॉट्स अॅप क्रॅश कसा करणार

मित्रांनो हि पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या मनाप्रमाणे अगदी काही तरी वेगळे असे सांगतो आहे. नाही म्हटल तरी कधी तरी तुम्हाला वाटलच असेल कि आपल्याला अमक्या तमक्या च व्हॉट्स अॅप क्रॅश करता आला तर कि मजा येईल आजची हि पोस्ट त्यासाठीच आहे पण लक्षात ठेवा फक्त गंमत म्हणून हि पोस्ट देत आहे आणि तुम्ही देखील गंमत म्हणूनच या पोस्ट चा वापर करा कोणाला त्रास देण्यासाठी किंवा कोणाचे नुकसान करण्यासाठी याचा उपयोग करून नका चांगल्या हेतूने माहिती देतो आहे तुम्ही देखील याचा वापर चांगल्या हेतूनेच करा अशी विनंती 

एक गोष्ट लक्षात घ्या ज्याचा व्हॉट्स अॅप तुम्ही क्रॅश कराल तो क्रॅश तोपर्यंत राहील जोपर्यंत ती व्यक्ती व्हॉट्स अॅप काढून पुन्हा इंस्टोल नाही करत किंवा व्हॉट्स अॅप चा डाटा क्लिअर नाही करत 

आता हे करायचे कसे याची माहिती घेऊ 

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एक छोटेसे एप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल त्याची लिंक मी तुम्हाला शेवटी देतो 
आता हे एप्लिकेशन डाउनलोड करून इंस्टाल करून घ्या आणि ओपन करा ओपन झाल्यावर ते काहीसे असे दिसेल 


आता समोर तुम्हाला सिलेक्ट लेव्हल साठी ऑप्शन दिसेल त्यामध्ये ५ लेवल असतील तुम्हाला हवी ती लेव्हल सिलेक्ट करा 

लेव्हल १ सिलेक्ट केली कि त्या व्यक्ती चा व्हॉट्स अॅप क्रॅश तर नाही होणार पण जरा जरा  अडकत चालेल 

लेव्हल २ सिलेक्ट केली कि लेव्हल एक पेक्षा जास्त त्रास देईल 

अशाप्रकारे लेव्हल ४ पर्यंत सिलेक्ट केला कि क्रॅश नाही करता येणार पण त्या व्यक्ती ला व्हॉट्स अॅप  वापरताना खूप त्रास होईल 

जर तुम्हाला पूर्णपणे क्रॅश करायचा असेल तर लेव्हल ५ सिलेक्ट करावी लागेल 

आता तुम्हाला हवी ती लेव्हल सिलेक्ट करा 

आणि समोर दिसत असलेल्या कोपी बॉम्ब टू क्लिपबोर्ड या बटनावर क्लिक करा जसे तुम्ही क्लिक कराल तसेच लगेच तुम्ही तुमच्या व्हॉट्स अॅप वर पोहोचाल मग ज्याचा व्हॉट्स अॅप  तुम्हाला क्रॅश करायचा असेल त्याच्या चाट विंडो वर जा आणि जिथे आपण टाईप करतो तिथे थोडा वेळ टच करून ठेवा लगेच पेस्ट चा ऑप्शन येईल  
पेस्ट वर क्लिक करा थोडा वेळ लागेल पण तुमच्या टाईप च्या जागेवर अनेक उभ्या रेषा आलेल्या दिसतील, मग काय तुम्हाला ते सेंड करायचं आहे जशी  ती पोस्ट सेंड होईल  ज्याला सेंड होईल त्याचा व्हॉट्स अॅप क्रॅश झालच म्हणून समजा. 

पण सांगितल्या प्रमाणे फक्त गंमत करा कोणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या 

टीप : पोस्ट  सेंड झाल्या नंतर लगेच ती पोस्ट डिलीट करून टाका नाही तर तुमच व्हॉट्स अॅप पण क्रॅश होऊ शकत  

Wednesday, February 10, 2016

आपल्या स्वतःच्या नावाची रिंग टोन तयार करा

विचार करा आपण आपल्या आपल्या सगळ्या गोष्टींबाबतीत सतत अपडेट राहण्याचा प्रयत्न करत असतो,तसेच आपण आपल्या रिंगटोन च्या बाबतीत देखील अपडेट राहण्यास नेहमी उत्सुक असतो पण समजा जर आपल्याला कोणतेही सोफ्टवेअर न वापरता आणि कोणताही जास्त त्रास न घेत आपल्या नावाची रिंगटोन बनवता आली तर किती मजा येईल ,
 आत्ता मी तुम्हाला तीच अगदी सोप्पी आणि साधी पद्धत सांगणार आहे ज्याने तुम्ही तुमच्या नावाची रिंगटोन बनवू शकता

तुम्हाला फक्त आधी गुगल वर जायचं आहे  येथे क्लिक करा म्हणजे गुगल वर जाल

आता गुगल सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला FDMR  टाईप करायचं आणि एक स्पेस देऊन ज्या नावाची रिंगटोन हवी आहे ते नाव लिहायचे बस एवढच करायचं  आणि एक एंटर द्यायला नका विसरू








एंटर प्रेस केले कि अनेक वेगवेगळ्या लिंक तुमच्या समोर दिसतील प्रत्येक लिंक वर तुमच्या नावाच्या वेगवेगळ्या पद्धतीने रिंगटोन बनवल्या असतील जसे तुम्हाला हिंदी मधून आणि इंग्रजी मधून जशी हवी तशी ट्राय करा आणि जी आवडेल तिला डाउनलोड करा आणि लगेच आपल्या मोबाईल वर रिंगटोन सेट करा

फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे डाउनलोड चा ऑप्शन दिसेल नाही दिसला तर डाउनलोड साठी लिंक दिली असेल

व्हॉट्स अॅप कॉम्पुटर वर कसे वापराल

मित्रांनो नवीन ब्लोग वर पहिलीच पोस्ट लिहित आहे. सगळ्यांना आवडेल अशी छान आणि छोटी पोस्ट,  
आपण सगळेच आता व्होट्सएप  वापरतोच आहो पण कधी कधी सारखाच मोबाईल धरून बसण्याचा कंटाळा येतो जर आपल्याला आपले व्हाट्स एप अकौंट आपल्या लॅपटॉप  किंवा कॉम्पुटर वर वापरता आले तर किती मजा येईल आणि ते हि कोणतेच सोफ्टवेर न वापरता आपण आत्ता तीच माहिती घेणार आहोत 

सर्वप्रथम तुम्हाला मी एक लिंक देतो आहे त्या लिंक वर क्लिक केल्यावर  तुम्हाला समोरच एक बारकोड दिसेल तो खाली दिलेल्या फोटो मध्ये तुम्हाला समजेल






आता तुम्हाला फक्त एक लहान काम करायचे आहे ते म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये व्होट्सएप चालू करा त्याच्या मेन्यु  मध्ये जा समोरच व्होट्सएप वेब हा ऑप्शन दिसेल त्यावर तच करा,








 क्लिक केल्या केल्या मोबाईल चा केमेरा चालू होईल मग लगेच कॉम्पुटर च्या स्क्रीन वर असलेला कोड स्कॅन करा,झाले एवढे केले कि तुम्हचे व्होट्सएप चे सगळे मेसेज व्हिडीओ तुम्हाला कॉम्पुटर वर दिसू लागतील आणि त्याचबरोबर तुम्ही कॉम्पुटर वर वापरू देखील शकता. 
हि लिंक फक्त मोझीला फायर फॉक्स,गुगल क्रोम आणि ओपेरा या ब्राउझर वर ओपन होईल काय मग आहे न गंमत, बघा करून लगेच 

  लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

टीप : लिंकवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या स्किप एड वर क्लिक करा म्हणजे तुम्ही मुख्य पेज वर जाल




Tuesday, February 9, 2016

पेन ड्राईव्ह आणि मेमरी कार्ड किंवा हार्ड डिस्क मधील डिलीट झालेला डेटा रिकव्हर करा

या पोस्ट मध्ये तुम्हाला खूप उपयोगाची आणि गरजेची गोष्ट सांगणार आहे. मित्रांनो आजच्या काळात कॉम्पुटर आणि मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य असा घटक झाला आहे,आणि या दोघांचा मुख्य प्राण म्हणजे हार्ड डिस्क , पेन ड्राईव्ह तसेच मेमरी कार्ड हेच आहे आपला सगळ्या प्रकारचा डेटा यांच्या मदतीनेच साठवला जातो,
अचानक आनंदाच्या प्रसंगी टिपलेला फोटो आपल्या मोबाईल च्या मेमोरी कार्ड मध्ये असतो तसेच एखाद्या सुंदर सहलीच्या आठवणी आपल्या कॉम्पुटर च्या हार्ड डिस्क मध्ये असतात कधीतरी आपल्याला आवडणारी गाणी मित्राकडून पेन ड्राईव्ह मध्ये आणलेली असतात असतात आणि आपण अचानक काही करी गडबड करतो आणि घाई घाईत या गोष्टी डिलीट करून टाकतो मग काय हळ हळ व्यक्त करण्याशिवाय आपण काही करू शकत नाही तस डेटा रिकव्हर करून देणाऱ्या अनेक ठिकाणे असतात परंतु त्याचा खर्च खूप जास्त असल्याने आपण तो पर्याय निवडू शकत नाही  पण जर काहीही खर्च न करता आपला डिलीट झालेला डेटा आपल्याला मिळवता आला तर ? आनंदाला पारावर उरणार नाही तर चल मग काय आणि कस करायचं ते आपण पाहू 
   सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या कॉम्पुटर मध्ये एक अगदी छोटेसे सोफ्टवेअर डाउनलोड करावे लागेल त्याची लिंक मी तुम्हाला पुढे देतो आहे
























सोफ्टवेअर ओपन केले कि ते काहीसे असे दिसेल आता तुम्हाला पेन ड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड किंवा जो ड्राईव्ह रिकव्हर करायचा आहे तो कोणता आहे तो सिलेक्ट करा पण त्याआधी तुम्हाला पेन ड्राईव्ह कॉम्पुटर ला जोडून ठेवला पाहिजे आता सिलेक्ट व्हॉल्यूम तो सर्च फोटोस या रकन्यामधून तुम्हाला तुमचा ड्राईव्ह सिलेक्ट करायचा आहे ज्या मधून तुमचा डेटा डिलीट झाला आहे 

सिलेक्ट केला कि उजव्या बाजूला स्कॅन नाऊ बटनावर क्लिक करायचे,एवढे केले कि तुमचा देत रिकव्हर होण्यास सुरुवात होईल



   
सेटिंग बटनावर क्लिक केले असता एड फाइल्स टाईप असा ऑप्शन दिसेल यामधून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या प्रकारच्या फाईल रिकव्हर करू शकता याचा उपयोग असा कि तुम्हाला फक्त इमेज फाईल रिकव्हर करायचा असतील तर तो पर्याय निवडून तुम्ही फक्त इमेज रिकव्हर करू शकता विनाकारण बाकी फाईल दिसणार नाही आणि तुमचा वेळ आणि मेमरी दोन्ही ची बचत होईल 

  
              सोफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा





Monday, February 8, 2016

नावासहित वाढदिवसाच्या शुभेच्छा MP3 बनवा

मित्रांनो या पोस्ट  मध्ये तुम्हाला एक लहान पण मजेशीर  असे काही सांगणार आहे ,
विचार करा तुमच्या घरात किंवा मित्र मैत्रिणी मध्ये कोणाचा वाढदिवस आहे आणि तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळ्या काही तरी शुभेच्छा द्यायचा विचार करत आहात,
समजा ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या नावासहित शुभेच्छा देणारे छान असे गाणे तुम्हाला मिळाले आणि ते तुम्ही तुमच्या व्होट्स एप ग्रुप वर आणि फेसबुक वर टाकले तर तुमचे किती आभार मानले जातील समोरची व्यक्ती देखील अशा शुभेच्छा पाहून किती आनंदून जाइल ना तर चल लगेच करून बघा 

सगळ्यात आधी मी तुम्हाला एक लिंक देतो या लिंकवर गेल्यावर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात स्किप एक वर क्लिक करा मग लगेच तुम्ही मुख्य पेज वर जाल ते खाली दिलेल्या चित्राप्रमाणे दिसेल

                                          पेज वर जाण्यसाठी येथे क्लिक करा

मुख्य पेज वर आल्यावर ते काहीस असे दिसेल तर तुम्हाला काय करायच आहे उजव्या बाजूला वर सर्च बॉक्स दिसत आहे त्या तिथे आपल्याला त्या व्यक्तीचे नाव टाकायचं आहे ज्याच्या नावाचे गाणे बनवून हवे आहे नाव टाकून झाले कि इंटर बटन दाबले कि समोर सर्च केलेले नाव आणि त्याच्याशी मिळती जुळती अनेक नावे दिसतील त्यातले योग्य त्या नावावर क्लिक करायचे एवढे केले कि झाले समोर वेगवेगळ्या प्रकारची थीम्स दिसतील जी आवडेल त्यावर क्लिक करायचे क्लिक केले कि लगेच  युटूब वर तुमचे गाणे प्ले होईल आवडले कि डाउनलोड करून लगेच पोस्त करा