Saturday, February 27, 2016

कमांड प्रॉम्प्ट वापरून पेन ड्राईव्ह फ़ाॅरमॅट कसा कराल ?




नेहमी आपण आपला पेन ड्राईव्ह ,मेमोरी कार्ड  या वस्तू USB द्वारे कॉम्पुटर ला जोडत असतो कधी आपल्या नाहीतर कधी दुसर्या कॉम्पुटर ला आपण जोडतो आणि बर्याच वेळा दुसर्याच्या कॉम्पुटर मध्ये व्हायरस असल्याने तो आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये येतो आणि मग असा पेन ड्राईव्ह फ़ाॅरमॅट होतो नाही, 
फ़ाॅरमॅट करण्यासाठी सर्वांना माहिती असलेली पद्धत वापरतो ती अशी आपण माय कॉम्पुटर मध्ये जातो हव्या त्या ड्राईव्ह वर राईट क्लिक करून फ़ाॅरमॅट हा पर्याय निवडतो आणि फ़ाॅरमॅट करतो 

परंतु कधी कधी आपल्या संगणकात असलेल्या व्हायरस मुळे पेन ड्राईव फॉरमेट होत नाही आणि मग अश्यावेळी काय करावे ते सुचत नाही आणि आपले काम अर्धवट राहते. 
त्यासाठी एक सोपा असा उपाय सांगतो ज्याचा आपल्या सर्वांना उपयोग नक्कीच होऊ शकेल चला तर मग काय करायचे ते पाहूयात 



सर्वप्रथम आपल्याला कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचे आहे त्यासाठी तुम्हाला Start -Accessories -Command promt  अशा पद्धतीने तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट सापडेल ते तुम्ही ओपेन करा 

आता कमांड प्रॉम्प्ट म्हणजे काही नाही फक्त एक काळी विंडो दिसेल, त्यामध्ये काही न करता फक्त format असे टाईप करायचे आहे आणि  नंतर फक्त एक स्पेस देऊन आपल्याला कोणता ड्राईव्ह फ़ाॅरमॅट करायचा आहे तो टाईप करावा उ.दा - C: D: E: F: आणि फक्त एक इंटर प्रेस करायचा आहे 


झाला एवढ झाला कि तुम्हाला and press ENTER when ready... असा मेसेज दिसेल त्यावेळी परत तुम्हाला एकदा इंटर  बटन दाबायचे आहे मग तुमचा पेन ड्राईव्ह फ़ाॅरमॅट होण्यास सुरुवात होईल १००% झाला कि कमांड प्रॉम्प्ट बंद करा आणि माय कॉम्पुटर मध्ये जाऊन बघा तुमचा पेन ड्राईव्ह फ़ाॅरमॅट झालेला असेल 

अनेकदा करप्ट झालेले पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड अशा प्रकारे फ़ाॅरमॅट केल्यास पुन्हा निट होतात 

टिप्स -

फ़ाॅरमॅट या शब्दामध्ये आणि ड्राईव्ह च्या नावा मध्ये एक स्पेस असणे गरजेचे आहे 

फ़ाॅरमॅट करताना ज्या ड्राईव्ह ला फ़ाॅरमॅट करायचे आहे त्याचे  आद्यअक्षर गरजेचे आहे ड्राईव्ह ला तुम्ही दिलेले नाव नको 
उ.दा C: D: E: F: हि आद्यअक्षरे हवी आहेत 

आद्याअक्षर नंतर : असे दोन बिंदू गरजेचे आहेत 

ज्या ड्राईव्ह मध्ये Operating system  असेल असा ड्राईव्ह फ़ाॅरमॅट होणार नाही 

Tuesday, February 23, 2016

कोणत्याही सोफ्टवेअर शिवाय पेन ड्राईव्ह ला पासवर्ड प्रोटेक्ट करा

मित्रांनो आज प्रत्येकाच्या खिशामध्ये एखादा पेन ड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड असतेच बर्याचदा आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये अतिशय महत्वाचा डेटा  असतो किंवा आपला खाजगी डेटा असतो अनेकदा आपला पेन ड्राईव्ह आपल्याशिवाय दुसरा कोणी देखील वापरत असतो नाही तर कधी आपला पेन ड्राईव्ह हरवला आणि तो कोणाला सापडला तर आपल्या डेटा  चा गैरवापर होऊ शकतो आणि असे होण्यापासून कसे रोखावे तेच आज सांगणार आहे म्हणूनच हि पोस्त आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची अशी आहे.


 आज आपण आपल्या पेन ड्राईव्ह ला पासवर्ड प्रोटेक्ट कसे करायचे ते पाहणार आहोत, तसे पाहायला गेल तर इंटरनेट वर पेन ड्राईव्ह ला पासवर्ड प्रोटेक्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे सोफ्टवेअर मिळतात परंतु ते डाउनलोड करण्यापसून ते पेन ड्राईव्ह पासवर्ड प्रोटेक्ट करण्यापर्यंत अनेक क्लिष्ट प्रक्रिया असू शकतात म्हणूनच आज आपण कोणतेही सोफ्टवेअर न वापरता आपला पेन ड्राईव्ह पासवर्ड प्रोटेक्टेड करणार आहोत.
 चला तर मग सुरुवात करू सुरवातीला तुम्ही तुमचा पेन ड्राईव्ह तुमच्या कॉम्पुटर ला जोड आणि माय कॉम्पुटर मध्ये जा





आता तुमचा पेन ड्राईव्ह जेथे दिसत आहे त्याच्यावर राईट क्लिक करा तेव्हा तुम्हाला काही ओप्श्न्स दिसतील त्यामधील Turn on BitLocker... हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा, आता तुम्हाला खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारला जाइल या ठिकाणी तुम्हाला जो हवा तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाईप करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा 

आता तुम्ही नेक्स्ट वर क्लिक केल्यावर तुम्हाला समोर पुन्हा दोन पर्याय दिसतील त्यातला पहिला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे  याचा उपयोग असा कि समजा तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला आहे तेव्हा तुमच्या कॉम्पुटर मधेच त्यासाठी पर्यायी पासवर्ड म्हणून एक फाईल सेव्ह होईल जेव्हा कधी तुम्ही तुमचा पासवर्ड विसराल तेव्हा तुम्हाला या फाईल चा उपयोग तुमचा पेन ड्राई व्ह ओपन करण्यासाठी होईल
 दुसरा पर्याय म्हणजे तीच फाईल तुम्हाला प्रिंट काढून हवी असल्यास तुम्ही त्याची प्रिंट काढून ठेऊ शकता यातील आपण पहिला पर्याय म्हणजे कॉम्पुटर मधेच रिकव्हरी फाईल सेव्ह करण्यास घेऊ हा पर्याय निवडून जेव्हा तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तुमची फाईल कोठे सेव्ह करायची आहे हे विचारले जाईल

 तुम्ही हव्या त्या जागी फाईल सेव्ह करा जसे तुम्ही पुढे जाल तसे तुम्हाला 

Are you ready to encrypt this drive ? असे विचारले जाइल म्हणजे तुम्ही कन्फर्म आहात का हे तुम्हाला विचारले जाइल  मग तुम्हाला  Start Encrypting  या बटनावर क्लिक करायचे आहे या नंतर तुम्हाला काही न करता फक्त वाट पहायची आहे कारण या प्रक्रीये साठी साधारण १० ते १५ मिनिटाचा कालावधी लागू शकतो काळजी न करता तुम्ही थोडा वेळ थांबलात तर तुमची प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला तसा मेसेज समोर दिसेल मग काय झाले काम तुमचा पेन ड्राईव्ह एकदा काढून पुन्हा जोडून पहा तुम्हाला पासवर्ड विचारला जाइल जोपर्यंत तुम्ही पासवर्ड टाईप करणार नाही तो पर्यंत तुमचा असलेला डेटा पाहू शकणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुमची Encrypting ची प्रक्रिया चालू आहे तो पर्यंत तुम्ही तुमचा पेन ड्राईव्ह डिस्कनेक्ट करू नका अन्यथा तुमचा असलेला डेटा करप्ट होण्याचा धोका आहे  

Sunday, February 21, 2016

रॅम काय असतो व कॉम्पुटर मध्ये त्याची भूमिका काय ?


मागील एखाद्या  पोस्ट मध्ये आपण मदरबोर्ड ची महिती घेतली होती,आज त्यालाच अनुसरून हि पोस्ट देत आहे. 
अनेकदा आपल्या कानावर रॅम हा शब्द पडलेला नक्कीच असेल मग तो कॉम्पुटर असो अथवा मोबाईल पण हा रॅम म्हणजे नक्की काय आहे तरी काय आणि त्याचा आपल्या कॉम्पुटर आणि मोबाईल मध्ये काय उपयोग ?
 रॅम म्हणजे (रॅन्डोम एक्सेस  मेमरी ) आता हे म्हणजे आणखी काय असा प्रश्न पडलाच असेल,
आपण कॉम्पुटर  अथवा मोबाईल असो त्यामध्ये मेमरी चा वापर करतो हे देखील सर्वांनाच माहित आहे जसे कि कॉम्पुटर मध्ये आपण हार्ड डिस्क चा वापर मेमरी म्हणून करतो किंवा मोबाईल मध्ये आपण मेमरी कार्ड चा वापर मेमरी म्हणून करतो बरोबर ना ?
तर रॅम म्हणजे देखील एक प्रकारची मेमरीच असते,परंतु तिचा वापर थोड्या वेगळ्या पद्धतीने होतो. थोडे आणखी खोलात जाऊन बघुयात 
ज्या प्रमाणे तुम्ही तुमचा डेटा कॉम्पुटरच्या मेमरी म्हणजेच हार्ड डिस्क मध्ये सेव्ह करता तसेच मोबाईल च्या मेमरी कार्ड मध्ये सेव्ह करता आणि तोच डेटा जेव्हा तुम्ही कॉम्पुटर किंवा मोबाईल कितीही वेळा  बंद करून चालू केला तरीही आहे तसाच राहतो आणि तुम्ही त्याचा वापर हवे तेवढ्या वेळा करू शकता उ.दा- कॉम्पुटर मध्ये असलेली   गाणी, मुव्हीज , गेम्स 
     पण रॅमच्या बाबतीत तसे नाही आहे,रॅम हि मेमरी जरी असली तरी तिचा वापर जोपर्यंत कॉम्पुटर अथवा मोबाईल चालू आहे तोपर्यंतच होतो एकदा का बंद करून चालू केले कि ती डेटा पुन्हा दिसत नाही 
उ.दा- तुम्ही काही सोफ्टवेअर  वापरत आहात किंवा गेम खेळत आहात त्याचवेळी तुम्ही काही आणखी काम करायचे म्हटले कि सर्व काही चालू ठेवून तुम्ही तिसरे काम करू शकता कारण हि सगळी कामे डेटा च्या स्वरुपात तात्पुरती रॅम मध्ये साठवली जातात पण समजा तुम्ही अचानक कॉम्पुटर बंद केला किंवा वीज कनेक्शन बंद झाले आणि जेव्हा तुम्ही पुन्हा कॉम्पुटर चालू कराल तर तुम्ही चालू ठेवलेले काम, गेम्स , सोफ्टवेअर  तुम्हाला तसेच चालू राहिलेले दिसणार नाही कारण रॅम म्हणजे तात्पुरत्या स्वरुपात असलेली मेमरी होय हि मेमरी जितकी जास्त तितके जास्त वेगवेगळी कामे एकाच वेळी लवकरात लवकर करता येतील म्हणून तुमचा कॉम्पुटर स्लो असल्यास तुम्हाला रॅम वाढवण्याचा सल्ला दिला जातो. 

आपल्या कॉम्पुटर मध्ये असलेल्या रॅमचे वर्गीकरण त्याच्या असलेल्या मदरबोर्ड वरून केले जातात तुमच्या माहिती साठी थोडक्यात सांगतो

पूर्वी पेंटीअम ३ कॉम्पुटर असायचे तेव्हा त्यात  एस.डी रॅम (SD RAM ) वापरले जायचे,
हे रॅम ३.३ व्होल्ट वर चालायचे 




त्यानंतर पेंटीअम ४ कॉम्पुटर आले तेव्हा त्यात डी.डी.आर १ रॅम (DDR 1) वापरले जाऊ लागले हे रॅम २.५ व्होल्ट वर चालतात 




मग तंत्रज्ञानाबरोबर पुढे  डी.डी.आर २ रॅम (DDR 2 ) आले,हे रॅम १. ८ व्होल्ट चालतात 





त्यानंतर आत्ता सध्या जास्त वापरात असलेले डी.डी.आर ३ रॅम  (DDR3 )आहेत जे कि १. ५ व्होल्ट वर चालतात 

यातील प्रत्येक प्रकार मागील रॅम पेक्षा अधिक वेगवान आहे परंतु कोणताही रॅम कोणत्याही मदरबोर्डला बसवता येत नाही.प्रत्येक मदरबोर्ड ला ज्या रॅमची योजना केलेली असते तोच रॅम त्यात लावला जातो 

Saturday, February 20, 2016

मदरबोर्ड काय ? व कसा ?





या पोस्ट मध्ये आपण मदरबोर्डची प्राथमिक स्वरुपात माहिती घेणार आहोत आपल्या पैकी अनेकांकडे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप कॉम्पुटर असतीलच. 
आपल्यापैकी अनेक जणांना मदरबोर्ड काय आहे व त्याचा उपयोग काय ते माहित नसेल तीच माहिती थोड्याफार प्रमाणात घेऊयात, 
  कॉम्पुटर मधील अनेक वस्तू आपल्याला माहित आहे तर काहींची फक्त नावे ऐकली आहे. एक कॉम्पुटर संच म्हणजे त्यात अनेक गोष्टी येतात,
उ.दा - माॅनिटर,कि बोर्ड , माउस , स्पीकर , पेन ड्राईव , प्रिंटर ,स्कॅनर इत्यादी 
आता हे झाले आपल्याला माहित असलेले किंवा रोजच्या वापरात पाहिलेल्या वस्तू, रोजच्या वापरात न दिसणाऱ्या देखील अनेक वस्तू आहे ज्यांचा उपयोग आपण कॉम्पुटर चालवताना करतो पण त्या वस्तू आपल्याला वरचे वर दिसत नाही 
उ.दा - प्रोसेसर ,रॅम , हार्ड डिस्क इत्यादी कारण त्या वस्तू आपल्या सी.पी.यु कॅबिनेट च्या आत असतात . 
आता कॅबिनेट च्या बाहेर आणि आतमध्ये इतक्या सगळ्या  वस्तू असतात या सगळ्या वस्तू एकमेकांशी कशा प्रकारे जोडल्या जातात किंवा एकमेकांबरोबर संपर्क कसा प्रस्थापित करतात आणि आपल्याला आऊटपुट कसे देतात ?
याचे उत्तर आहे मदरबोर्ड ज्याप्रमाणे आईशिवाय मनुष्याचे अस्थित्व असू शकत नाही त्याचप्रमाणे मदरबोर्ड शिवाय कॉम्पुटर चे अस्थित्व असू शकत नाही म्हणून त्याला मदरबोर्ड असे संबोधले जाले 
     आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मदरबोर्ड म्हणजे नक्की काय असतो ?
मदरबोर्ड हा एक पी.सी.बी असतो ( प्रिंटेड सर्किट बोर्ड ) यावर अनेक प्रकारचे सर्किट्स प्रिंटेड स्वरुपात असतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आय.सी (इंटिग्रेटेड सर्किट ) लहान मोठे कपॅसिटर , काॅईल व इतर तस्तम इलेक्ट्रोनिक्स काॅम्पोनंट्स   असतात. 
   त्याच बरोबर त्यावर अनेक प्रकारचे स्लॉट आणि पोर्ट असतात
उ. दा - रॅम स्लॉट यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा तेवढा रॅम लावू शकता 

सी पी यु साॅकेट- यामध्ये तुम्हाला हवा तो प्रोसेसर लावता येऊ शकतो 
तसेच आय डी ई आणि साटा स्लॉट- ज्याचा वापर तुम्ही हार्ड डिस्क लावण्यासाठी करू शकता . 
त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरून जे कीबोर्ड, माॅनिटर ,माउस ,प्रिंटर इ . वस्तू कॉम्पुटर ला जोडता ते पोर्ट देखील मदरबोर्ड वरच असतात. 
एकंदर याचा सारांश काय कि सगळ्या डायरेक्ट अथवा इंडायरेक्ट हार्डवेअर यांना एकत्र जोडण्याचे काम मदरबोर्ड करते आणि म्हणूनच कॉम्पुटर ला दिलेली माहितीचे आदान प्रदान होऊ शकते. 
   हि झाली मदरबोर्ड ची माहिती नंतरच्या पोस्ट मध्ये मदर बोर्ड शी जोडल्या जाणाऱ्या  वेगवेगळ्या वस्तूंवर माहिती घेऊ